गणेशमूर्ती पुनर्विसर्जनासाठी भाड्याने घेणार खाण स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावास मान्यता

गणेशमूर्ती पुनर्विसर्जनासाठी 
भाड्याने घेणार खाण
स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावास मान्यता
Published on

पुणे, ता. १७ ः गणेशोत्सव व नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत गणेशमूर्ती व दुर्गादेवी मूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी महापालिका खाण भाडेतत्वावर घेणार आहे. त्यासाठी साडे बारा लाख रुपये महापालिकेकडून संबंधित खाण मालकास दिले जाणार आहेत. त्यासंबंधीच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली.
गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत महापालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती व दुर्गादेवी मूर्तींचे विसर्जन होते. संबंधित मूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी तात्पुरत्या स्वरुपात खाण भाडेतत्त्वावर घेतली जाते. त्यानुसार, यंदाही महापालिकेने दरपत्रक मागविले होते. त्यानुसार भावडी येथील खाणमालक सोमनाथ तांबे यांनी २५ दिवसांसाठी खाण भाडेतत्वावर देण्याचे सर्वात कमी १५ लाख रुपयांचे दरपत्रक सादर केले होते. त्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. दरम्यान, महापालिकेकडून संबंधित खाण मालकाशी चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर खाण मालकाने दर कमी करून साडे बारा लाख रुपये केला. त्यानुसार, संबंधित प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
गणेशोत्सव आणि दुर्गादेवी महोत्सव हा संवेदनशील विषय असल्याने पुनर्विसर्जनाची व्यवस्था वेळेत करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे साडे बारा लाख रुपयांच्या फेरसादर दरानुसार खाण भाडेतत्त्वावर घेण्यास हरकत नसल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. या कामासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे आवश्‍यक तरतूद उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com