दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

दीड दिवसाच्या 
गणरायाला निरोप
Published on

पुणे, ता. १५ : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुणेकरांनी मंगळवारी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. या वेळी नागरिकांनी नदीप्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या आणि मूर्तीसंकलन केंद्रांना पसंती दिली.
सोमवारी (ता. १४) गणपतीचे आगमन झाले असून, हा उत्सव १२ दिवस चालणार आहे. पण अनेकांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची परंपरा आहे. त्यानुसार दुपारनंतर पेठांसह उपनगरांमधील नागरिक विसर्जनासाठी घराबाहेर पडले. महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात दोन हजार ४३३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ३८२ मूर्ती बांधलेल्या विसर्जन हौदांमध्ये, तर एक हजार ४७५ मूर्ती लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. ५७६ नागरिकांनी मूर्तीसंकलन केंद्रांकडे मूर्ती दिल्या. तर या वेळी तीन हजार ३२८ किलो निर्माल्यही जमा झाले. नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही कृत्रिम हौदात मूर्ती विसर्जनास पसंती दिली असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष वारुळे यांनी दिली.
नगररस्ता-वाघोली भागात सर्वाधिक ९०२ मूर्ती संकलित करण्यात आल्या. यात ५४७ मूर्ती बांधलेल्या हौदात, तर ३५५ मूर्ती लोखंडी टाक्यांत विसर्जित झाल्या. सिंहगड रस्ता परिसरात ३१५, धनकवडी-कात्रज-आंबेगावमध्ये ४३०, कोंढवा-उंड्रीत २५५, हडपसर-मांजरीत २३८, बिबवेवाडीत ११४ आणि कसबा पेठेत ८४ मूर्तींचे विसर्जन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com