Administrative Failure and Traffic Delays Mar Pune Ganesh Visarjan Procession
sakal
पुणे : मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीची शिस्तबद्ध परंपरा यंदा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मोडली गेली. मात्र तरीही मानाच्या पाच गणपती मंडळांनी शिस्तबद्ध परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. कसबा पेठेतून महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यापर्यंत पोहोचण्याच्या मुख्य मार्गावर अन्य मंडळे अाडवी आली असताना मानाच्या मंडळाला रस्ते मोकळे करून देण्यात वाहतूक शाखा आणि पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरले.