पुणे : सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीविना गणेशविसर्जन

मिरवणूकीविना पुण्यातील गणपती विसर्जन अपुर्ण आहे असा सूर पुणेकरातून ऐकायला मिळला.
visarajan
visarajansakal

शिवाजीनगर : मिरवणूकीविना पुण्यातील गणपती विसर्जन अपुर्ण आहे असा सूर पुणेकरातून ऐकायला मिळला. ढोल,ताशांचा गजर ,डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई, एकामागोमाग रांगेत असलेले गणपती मंडळे,गुलाल,भांडाऱ्याची उधळण, गणपती सजावट, देखावे, पेठा मधून उत्साही वातावरणात घुमणारा आवाज

असं चैतन्यमयी वातावरण पाहण्याची सवय पुणेकरांना झाली होती.मात्र मागील वर्षापासून या सगळ्या वातावरणावर कोरोनाचे सावट येऊन ठेपले आणि पुणेकरांचा हिरमोड झाला.सलग दुसऱ्या वर्षी ना गोंगाट,ना मिरवणूक यामुळे पेठा सुन्न-सुन्न झाल्या होत्या.पेठेत राहणाऱ्या नागरिकांचे कान, ढोल ताशांच्या गजराचा आवाज ऐकायला आतुरले होते.या वर्षी गणेश भक्तांना मिरवणूक काढता आली नसली तरी पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट कमी व्हावे आणि गणेश भक्तांना दुप्पट आनंदात मिरवणूक काढता यावी असा विश्वास वाटतो.

visarajan
घोडेगावमध्ये जुगारावर मोठी कारवाई.

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी झाली.गणपती विसर्जनाच्या वेळी नेहमी उत्साही वातावरण असतं ते बघता - बघता आयुष्याची चाळीस वर्षे काढली.लहानपणी आई-वडीलांच्या खांद्यावर बसून हा उत्सव बघत आम्ही मोठे झालो.मात्र कोरोनामुळे दोन वेळा मिरवणूक झाली नाही,त्याचं दुःख सदैव राहणार आहे.मागील वर्षी पेक्षा या वर्षी थोडासा दिलासा मिळाला आहे.किमान मांडवात गणपती होते.कोरोनाचा संपूर्ण नाश होऊन पुर्वी प्रमाणे उत्सव साजरा व्हावा"

- कीर्तीराज आगलावे रहिवासी नारायण पेठ.

"गणपती बाप्पाला निरोप देताना वाद्यांची परवानगी दिली असती तर प्रसन्न वातावरण झालं असतं.यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट टळले तर उत्सव जोमाने करायचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे".

- महेश खालकर, सदाशिव पेठ.

"वास्तविक पाहता कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे सगळे नियम पाळावे.आजची मिरवणूक फार सुनी-सुनी वाटते.ढोल ताशांचा गजर

visarajan
नागपूर : वर्षभरात १२ शाळा बंद तर १,७९६ विद्यार्थी झाले कमी

पुढच्या वर्षी बाप्पाने वाजवून द्यावा ही मनापासून इच्छा आहे.कोरोनाचे सगळे नियम पाळले पाहिजे‌.त्यामुळे आपण साध्य पध्दतीने सण साजरे करतोय".

- राजेश येनपुरे रहिवासी सदाशिव पेठ.

"ढोल,ताशा,झांज पथक, पारंपारिक वाद्याशिवाय पुण्यातील गणेश विसर्जन अपूर्ण आहे.उत्साही वातावरण पाहिजे.मिरवणूकीच्या वेळी फुगे विक्रेते,स्टॉलधारक रस्त्यावर असायचे तो वेगळाच माहोल असायचा.पुर्वीच्या वातावरणाची आठवण येते.पुढच्या वर्षी दुप्पट उत्साहाने सण साजारे होतील ही अपेक्षा आहे".

- देविना प्रभूणे शनिवार पेठ.

"गणपती म्हटलं तर ढोल,ताशे पाहिजेत.ढोल,ताशे नसतील तर बाप्पाला निरोप दिल्यासारखे वाटत नाही.आम्ही चाळीस वर्षांपासून नारायण पेठेत राहतो.जे पेठात राहतात त्यांना या आवाजाची आठवण येतेच.पुर्वी प्रमाणे पुन्हा चालू व्होयला पाहिजे"

- रोशनी गायकवाड, नारायण पेठ.

"कोरोनामुळे नागरिकांमध्ये निराशा खूप झाली आहे.पुढच्या वर्षी धुमधडाक्यात मिरवणूक साजरी व्हावी ही इच्छा आहे".

-सुजाता वडवेकर, नारायण पेठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com