Pune Ganpati Visarjan
sakal
पुणे - गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल केले आहेत. शुक्रवारी (ता.२५) सकाळपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आणि परिसरात २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून नो-पार्किंग लागू करण्यात येणार आहे.