

pune news
Sakal
पुणे, : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे ५२९ झाडे तोडण्याचे नियोजन केले होते. यामुळे मोठी वृक्षसंपदा नष्ट होणार असल्याने नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी यास कडाडून विरोध केला होता. त्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा यासंदर्भात अभ्यास केला असता आता केवळ ३३ झाडे तोडावी लागणार असून, त्यातील काही झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. दरवेळी नागरिकांच्या तक्रारीला नकारात्मक न घेता त्याचा सकारात्मक विचार केल्याने गणेशखिंड रस्त्यावरील ४९६ झाडांना जीवदान मिळाले आहे.