
पुणे : चौदा विद्या अन् चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची आतुरता आणि उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. साऱ्या दुःखांचे मळभ दूर सारून सुखाची पेरणी करणाऱ्या गणेशोत्सवाच्या आनंदसोहळ्याला बुधवारपासून (ता. २७) प्रारंभ होत आहे. गणरायाचे जल्लोषात आणि दिमाखात स्वागत करण्यासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली आहे.