
पुणे: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गौरी आगमन, २ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) या तीन दिवशी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात मद्यविक्री दुकाने आणि आस्थापनांना मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत जारी करण्यात आला असून, सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.