

Ganeshotsav traffic restrictions in Pune
esakal
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी साहित्य खरेदी तसेच विविध गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. या कालावधीत जड वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.