Pune Ganesh Festival
Pune Ganesh Festival Sakal

Pune Ganpati Festival : पोलिसांच्या भूमिकेमुळे उत्सव काळात नवा वाद?

Pune Ganpati Festival : गणपती उत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहे. त्यात आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या पुण्यातील गणेशोत्वात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका मंडळाने यावर्षी 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या मंडळाला संबंधित देखावा उभारण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ऐन उत्सवकाळात पुण्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Ganesh Festival
Maharashtra Monsoon Session Live: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत अन्य मुद्द्यांवरुन अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या संगम तरुण मंडळाचे यंदाचे 56 वर्ष आहे. तसेच हे मंडळ आचपर्यंतच्या त्यांच्या विविध विषयांवरील जिवंत देखाव्यांमुळे चर्चेत असतात. त्यात यंदा या मंडळाकडून 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा मानस होता. मात्र, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण देत संगम तरुण मंडळाला हा देखावा साकारण्यास परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी आहे.

Pune Ganesh Festival
Mumbai Local : करीरोड स्थानकाजवळील तांत्रिक बिघाड दुरूस्त; मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

खरा इतिहास दाखवण्यात काय भीती?

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित जो काही इतिहास आहे तो दाखवण्यास काय भीती आहे? आपल्या हिंदुस्थानात महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर, मग काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का? असा संतप्त संगम तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. संबंधिथ देखाव्याला परवानगी देण्यात यावी यासाठी मंडळाकडून रीतसर परवानगी मिळावी यासाठी 11 ऑगस्टलाच पोलिसांना पत्र देण्यात आले होते. यात सर्व सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याचे आश्वासनही मंडळाकडून देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com