Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

गतवर्षीच्या (२०२५ मधील ९२.६ डेसिबल) तुलनेत यंदा ध्वनी सरासरी पातळीत तब्बल १२ डेसिबलने मोठी वाढून १०४.५ नोंदवण्यात आली.
pune ganpati visarjan dj sound

pune ganpati visarjan dj sound

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - धावपट्टीवरून आकाशात झेपावणाऱ्या विमानाचा धावपट्टीवर ऐकू येणारा कानठळ्या बसवणारा आवाज साधारण १२० डेसिबल (डेसिबल) इतका असतो; यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्त्यावर पुणेकरांनी तब्बल २४ तास याच भीषण आवाजाचा थरार अनुभवला. यंदा विसर्जनापूर्वी शहरात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला होता.

डीजेच्या वाढत्या त्रासाविरोधात सजग नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, बैठकांचे सत्र रंगले आणि जनजागृतीही झाली. त्यामुळे यंदा आवाजाचा दणदणाट कमी होईल अशी पुणेकरांना रास्त अपेक्षा होती; मात्र या सर्व अपेक्षांवर पाणी फेरत लक्ष्मी रस्त्यावर गोखले चौकात रात्री आठ वाजता तब्बल ११५.४ डेसिबल इतक्या सर्वाधिक ध्वनी पातळीची नोंद झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com