

Pune Ganpati Visarjan procession being monitored through live GPS tracking, CCTV surveillance and real-time traffic updates by Pune Police
esakal
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना मिरवणुकीची माहिती आणि वाहतुकीचे मार्गदर्शन मिळावे यासाठी पुणे पोलिसांकडून लाईव्ह ट्रॅफिक आणि प्रोसेशन ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे प्रमुख गणपती मंडळांचे लाईव्ह लोकेशन पाहता येणार असून, विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, वाहतुकीवर परिणाम झालेले रस्ते आणि महत्त्वाचे अपडेट्सही रिअल टाइममध्ये मिळणार आहेत.