chain snatching
sakal
पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी शहराच्या मध्यभागात अक्षरशः उच्छाद मांडला. भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्रे आणि मोबाइल लांबविल्याच्या ३८ घटना दोन दिवसांत नोंदविल्या गेल्या आहेत. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, लोकमान्य टिळक चौक आणि दगडूशेठ गणपती परिसरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला. अनेकांनी तक्रारी न दिल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.