esakal | पुणे : सावित्रीबाई फुले उद्यानाच्या नावात 'साध्वी'; ३० वर्षांनंतर चूक आली लक्षात
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले नावाच्या आधी 'साध्वी'; ३० वर्षांनंतर चूक आली लक्षात

१९९१ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्यानाचा कोनशीला समारंभ झाला होता.

सावित्रीबाई फुले नावाच्या आधी 'साध्वी'; ३० वर्षांनंतर चूक आली लक्षात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर असेल्या उद्यानाच्या नावात सावित्रीबाई फुले यांच्या नावाआधी साध्वी असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत ३० वर्षांनी आक्षेप घेण्यात आला. गेल्या ३० वर्षांमध्ये ही बाब कोणाच्याही लक्षात आली नव्हती. फलकावर असलेलं साध्वी हे नाव पुसण्यात आलं. अनेकांनी याबाबत अर्ज देण्यात आल्यानंतरही काही कारवाई करण्यात आलं नव्हतं. तात्पुरतं हे नाव पुसण्यात आलं आहे. मात्र त्याचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाआधी साध्वी या शब्दाबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असिम सरोदे यांनी फेसबुकवर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर महापौर यांनी उद्यानाच्या नावात साध्वी हे शब्द १९९१ मध्ये लावण्यात आल्याचं सांगितलं. १९९१ मध्ये उद्यानाच्या कोनशीला समारंभाचा फोटोही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी असिम सरोदे यांना पाठवला.

हेही वाचा: पुणे : प्राणिसंग्रहालय कधी होणार सुरू?

१९९१ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्यानाचा कोनशीला समारंभ झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. आता ही चूक लक्षात आली असून त्यात सुधारणा करावी असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाआधी असलेले साध्वी शब्द काढून टाकावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

loading image
go to top