Pune : गॅस सिलेंडरच्या वायुगळती मुळे आग; महिला जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas cylinder

Pune : गॅस सिलेंडरच्या वायुगळती मुळे आग; महिला जखमी

धायरी : पहाटे तीन वाजता नऱ्हे गाव, भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या सोनाई निवास या इमारतीत घरगुती सिलेंडरमधून गॅस गळतीने स्फोट होऊन आग लागली. त्यामध्ये चैत्राली मांडरे गंभीर जखमी झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान, नवरात्री देवघरातील समईतील दिवा रात्रभर सुरू असल्यामुळे हा स्फोट झाला आहे. तर घटनेनंतर घटनास्थळी पोहोचताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घरामधील वायुगळती असणारा सिलेंडर प्रथमतः बाहेर काढत जवानांनी पाण्याचा मारा केला. गृहपयोगी वस्तुंना लागलेली आग इतरत्र पसरु न देता पुर्णपणे आग विझवत पुढील धोका टाळला. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी जवानांनी घरातील मोकळे इतर दोन सिलेंडर बाहेर काढले व सुरक्षेच्या कारणास्तव वायुगळती होत असलेला सिलेंडर स्वतच्या ताब्यात घेतला.

तसेच अग्निशमन अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, दलाची मदत पोहोचण्याआधी घरातील महिला आगीमुळे जखमी झाल्याने तिच्या पतीने तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच घटनास्थळी सिंहगड रोड पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस व कर्मचाऱ्यांना धाव घेऊन पुढील कारवाई करण्यात आले.

 यावेळी सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर, तांडेल पांडुरंग तांबे, वाहन चालक संतोष चौरे व फायरमन नितीन मोकाशी, सतीश डाकवे, संजू चव्हाण तसेच मदतनीस कोकरे यांनी कामगिरी केली .