

Pune Gas Shortage
sakal
पुणे : युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या गॅस सिलिंडर टंचाईचा फटका केवळ पुण्यातील खानावळींनाच नव्हे, तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मलाही बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि काळ्या बाजारात गगनाला भिडलेले भाव यामुळे पुण्यासह देशभरातील अनेक क्लाउड किचन आणि छोट्या हॉटेल्सनी ऑनलाइन ऑर्डर्स घेणे थांबवले आहे.