
Pune Diwali Festive
Sakal
पुणे : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तयारीसाठी पुणेकरांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा नागरिकांनी गजबजल्या होत्या. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, रास्ता पेठ, रविवार पेठेसह उपनगरांमधील बाजारपेठांत पुणेकरांनी गर्दी केली होती. एवढेच नव्हे तर मॉल व इलेक्ट्रॉनिक दुकानांतही ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहत होती. दिवाळीच्या पारंपरिक वस्तूंबरोबरच आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत मोठी मागणी आहे.