
पुणे : शहरातील सांडपाणी वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला राज्य शासनाकडून दोन अद्ययावत वाहने देण्यात आली असून, त्याचे लोकार्पण आज महापालिकेत पार पडले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अधिक्षक अभियंता जगदीश खानोरे, संतोष तांदळे, कार्यकारी अभियंता अजय वायसे आदी उपस्थित होते.