

पुणे, ता. ६ : हडपसर ते घोरपडी दरम्यान २.५ किलोमीटर लांबीच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असा १५ दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात एकूण १३६ रेल्वे गाड्यांची सेवा प्रभावित होणार असून, ४२ गाड्या रद्द, तर २५ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
हडपसर ते घोरपडी (जीसीएमसी) दरम्यान मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी इंजिनिअरिंग, सिग्नल आणि ओएचइ (ओव्हरहेड इक्विपमेंट) ही महत्त्वाची तांत्रिक कामे केली जाणार आहेत. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
या ४२ गाड्या रद्द :
- पुणे-मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे : इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस व पुणे-मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस.
- पुणे-नागपूर मार्गावरील रेल्वे : पुणे-नागपूर-पुणे गरीब रथ एक्स्प्रेस, पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस
- अन्य महत्त्वाच्या रेल्वे : सोलापूर-मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस, दादर-शिर्डी-दादर एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-शिर्डी-पुणे एक्स्प्रेस.
- डेमू व लोकल : पुणे-दौंड (७१४०७/०८, ७१४०४/०५, ७१४०१/०२, ७१४१३), पुणे-बारामती (७१४११/१२), सातारा-पुणे (७१४१९/२०), अहमदनगर-बीड (७१४४१/४२) आणि पुणे-लोणावळा लोकल (९९८१२, ९९८१८, ९९८१३, ९९८२०, ९९८२१).
---------------
या २५ गाड्यांचा मार्ग बदलला :
- पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे : १२२२१ (पुणे-हावडा), ११०७७ (पुणे-जम्मू तावी), १२१३५ (पुणे-नागपूर), २२१३१ (पुणे-बनारस), २२१७१ (पुणे-राणी कमलापती).
- मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-लोणावळा-पुणे मार्गे : १२२२२ (हावडा-पुणे), ११०७८ (जम्मू तावी-पुणे).
- कल्याण-इगतपुरी-मनमाड-दौंड मार्गे : २२१५९ (मुंबई-चेन्नई), १८५२० (एलटीटी-विशाखापट्टणम).
- सोलापूर-कुर्डूवाडी-मिरज-सातारा-पुणे मार्गे : ११३०२ (बंगळुरू-मुंबई), २२७१८ (सिकंदराबाद-राजकोट).
- मनमाड-दौंड-कुर्डूवाडी-पंढरपूर-मिरज मार्गे : १२७८० (निझामुद्दीन-वास्को), २२६८६ (चंदीगड-यशवंतपूर).
- पुणे-सातारा-मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी-सोलापूर मार्गे : ११०१९ (मुंबई-भुवनेश्वर), २२१४३ (मुंबई-बिदर), ११०१३ (एलटीटी-कोईम्बतूर), १७२२२ (एलटीटी-काकीनाडा).
- सोलापूर/दौंड-अहमदनगर-मनमाड-इगतपुरी-कल्याण मार्गे : १६३४० (नागरकोइल-एलटीटी), १२१६४ (चेन्नई-एलटीटी), १६३३२ (त्रिवेंद्रम-एलटीटी), ११०१४ (कोईम्बतूर-एलटीटी), १८५१९ (विशाखापट्टणम-एलटीटी).
- कोल्हापूर-मिरज-कुर्डूवाडी-दौंड-अहमदनगर-मनमाड मार्गे : १२१४७ (कोल्हापूर-निझामुद्दीन), १२७८१ (म्हैसूर-निझामुद्दीन).
- सातारा-जेजुरी-पुणे-लोणावळा मार्गे : ११०२८ (सातारा-दादर).
या रेल्वे देखील प्रभावित :
अंतिम स्थानकाआधीच थांबणाऱ्या/तिथूनच सुटणाऱ्या : ३३
वाटेत थांबवून नियंत्रित केल्या जाणाऱ्या गाड्या : २२
प्रस्थान वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्या : १४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.