

Good Samaritan helps seizure patient Pune
sakal
पुणे : रस्त्यात कोणाचा अपघात घडला तर बघ्यांची गर्दी जमते. मदतीला फार कमी पुढे येतात. मात्र, दुचाकी चालवत असताना शुक्रवारी (ता.२३) रोजी फीट येऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला सिंहगड रस्त्यावरील समर्थनगर येथील मयूर निवंगुणे या युवकाने पाहताच गर्दीतून पुढे येत त्याला रस्त्याच्या कडेला बसवले. त्यांच्या घरी फोन करून माहिती दिली. इतकेच नव्हे तर घरी देखील नेऊन सोडले. या धकाधकीच्या जीवनात एकीकडे माणुसकी, संवेदना कमी होत असताना मयूर ने दाखवलेले धाडस व केलेल्या मदतीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.