
पुणे : सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये निळ्या रेषेच्या आतील बांधकामांचे पुनर्वसन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.