विकसित राज्यासाठी पदवीधरांचे योगदान महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा आशावाद

विकसित राज्यासाठी पदवीधरांचे योगदान
महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा आशावाद
Published on: 

पुणे, ता. १७ : पदवीधरवर्ग ही देशाची मनुष्यबळसंपत्ती आहे. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ हे स्वप्न साकार करायचे असेल, तर या पदवीधरांचे योगदान सर्वात मोठे असणार आहे. त्यांना या वाटचालीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने माझा ‘संकल्पनामा’ साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी माहिती पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘‘हम वादे नहीं, इरादे लेकर आये हैं, असा विश्वास देत २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले. ‘संकल्प ते सिद्धी’ याचा अनुभव आता देशातील जनता घेऊ लागली आहे. ही भावना लक्षात घेऊनच पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारांसमोर मी माझा ‘संकल्पनामा’ ठेवला आहे.’’
संकल्पनामा मांडताना वास्तवाचे भान, मतदारांच्या अपेक्षांची जाण आणि समस्यांवर दूरगामी परिणाम घडविण्याची दृष्टी असणे महत्त्वाचे असते, ही माझी भावना आहे, असे सांगून डॉ. जाधव म्हणाल्या, ‘‘मी गेली २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे प्रतिवर्षी हजारो तरुण-तरुणींसमवेत संवाद होतो. जगभरात तरुणांसाठी नवे कोणते ट्रेंडस येत आहेत, हे समोर येते. या संवादातून अनेक मुद्दे माझ्या लक्षात आले आहेत.’’
डॉ. जाधव म्हणाल्या, ‘‘पदवीधर मतदार हा सजग आणि जागतिक स्थितीचे भान असलेला असतो. त्यामुळे त्याच्याशी विश्वासाच्या नात्यानेच संवाद साधायला हवा, हे माझे सूत्र आहे. यातच पदवीधर महिला ही एक स्वतंत्र वर्गवारी आहे. त्यांच्यात काही जणी नोकरी-व्यवसाय करतात, तर काही जणी गृहिणीपदाची जबाबदारी समर्थपणे पेलत असतात. या सर्वांचा विचार करून आम्ही ‘संकल्पनामा’ निश्चित केलेला आहे. ’’
----------
डॉ. जाधव, गावडे यांना
पाठिंबा द्या ः कोरे
वारणानगर ः कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे या शिक्षणमहर्षींनी निरपेक्ष वृत्तीने महाराष्ट्राला शिक्षित करण्याचे काम केले. शिक्षणाच्या बदलणाऱ्या स्वरूपाला पायबंद घालण्यासाठी आणि गोरगरीब मुलांना आधार देण्यासाठी डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना भक्कम पाठिंबा द्या, असे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मेळाव्यात आमदार कोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘गोरगरीब समाजाला शिक्षित केले तरच देशाची प्रगती होते. यासाठी उच्चशिक्षित, आधुनिकतेची कास धरणारे महायुतीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीक्रमाने विजयी करा.’’
डॉ. अशोकराव माने, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांची यावेळी भाषणे झाली.
यावेळी माजी शिक्षक नेते दादासाहेब लाड, राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बाबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्नेहल व्हटकर, शिवाजीराव मोरे, डी. एस. घोगरे, राजेंद्र माने, विजयकुमार माने, प्रा. नामदेव चोपडे, कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग, माजी आमदार भगवान साळुंखे, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, वारणा शिक्षण मंडळाचे सीईओ डॉ. व्ही. व्ही. कारजिंनी, एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक ए. बी. पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ः ५९७२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com