Pune Gram Panchayat: थेऊर ग्रामपंचायत फेर आरक्षण सोडतीवर मोठा वाद; १७ जुलैची नोटीस,परंतु सभा नाही, १८ जुलैची आरक्षण प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात!

थेऊर ग्रामपंचायतीच्या फेर आरक्षण प्रक्रियेवर ग्रामस्थांचा संताप; अचानक ग्रामसभा, अपूर्ण माहिती आणि कथित नियमभंगामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
Residents have questioned the transparency of the process and warned of approaching higher authorities over the alleged procedural violations.

Residents have questioned the transparency of the process and warned of approaching higher authorities over the alleged procedural violations.

Sakal

Updated on

थेऊर : हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या वॉर्ड फेर आरक्षण प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला असून, संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२ जून २०२६ रोजी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर वॉर्ड क्रमांक ४ च्या आरक्षणावर हरकत दाखल झाली होती. त्यानंतर प्रांताधिकारी स्तरावर सुनावणी होऊन अपर तहसीलदारांनी वार्ड क्रमांक ४ मधील फेर आरक्षणाबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.मात्र,राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १० जुलैपर्यंत अंतिम आरक्षण जाहीर होणे अपेक्षित असतानाही थेऊरची अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध झाली नव्हती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com