pune grand tour AI Technology Used for Road Quality Inspection for the First Time in Maharashtra
sakal
पुणे : ‘पुणे ग्रँड टूर’च्या दुसऱ्या पर्वासाठी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यात प्रथमच अशाप्रकारे पथदर्शी प्रयोग राबविण्यात आला आहे.
रस्त्यांवरील कमतरता ओळखणे, कोणत्या ठिकाणी किती कामाची गरज आहे, हे दाखवणे आणि काम पूर्ण झालेल्या भागांची नोंद ठेवणे, अशी कामे ‘एआय’च्या माध्यमातून केली जात आहेत. या प्रकल्पाची कामे पूर्ण झाल्यानंतर राज्यातील अन्य प्रकल्पांसाठीही ‘एआय’च्या वापराबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली.