pune grand tour cycle competition
sakal
पुणे - पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी काढलेल्या निविदेतील अटीशर्तीवरून पथ विभागावर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाले आहेत. रिस्टेटमेंटच्या निविदेतही गंभीर आरोप झाल्याने ही निविदा रद्द करावी लागली होती. पुन्हा हाच प्रकार या कामात होऊ नये यासाठी प्रशासनाने एक पाऊल मागे घेत अटी शिथिल केल्या आणि निविदेसाठी चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे.