Pune Grand Tour 2026 police
esakal
पुणे
Pune Grand Tour: ''सायकल स्पर्धेमुळे पुण्यातील वाहतुकीवर फारसा ताण नाही'', पुणे पोलिस नेमकं काय म्हणाले?
Pune Grand Tour 2026 Seamless Execution Thanks to Precision Police Planning: पोलिसांच्या चोख नियोजनामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा यशस्वी पार पडली. काही ठिकाणी नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागलं.
पुणे: शहर पोलिस दल आणि वाहतूक शाखेच्या सूक्ष्म व कौशल्यपूर्ण नियोजनामुळे ‘पुणे ग्रँड टूर’ स्पर्धा सुरक्षित आणि शिस्तबद्धरीत्या पार पडली. सुमारे पाच हजार पोलिस अधिकारी आणि अंमलदारांच्या तैनातीसह करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय टळत स्पर्धा विना अडथळा पार पडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

