उत्कृष्ट नियोजनाबद्दल पौड पोलिसांचा सन्मान

उत्कृष्ट नियोजनाबद्दल पौड पोलिसांचा सन्मान
Published on

पिरंगुट, ता. २९ : पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन केल्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पौड पोलिसांचा वरिष्ठ कार्यालयाने सन्मान केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गील यांनी पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलिस हवालदार राजेश गायकवाड आणि मनोज कदम यांचा गौरव केला आहे. ही स्पर्धा माण, घोटावडे, अंबडवेट, दारवली, पौड, चाले, कोळवण तसेच काशिग आदी गावांतील रस्त्यावरून पार पडली. हा सर्व परिसर पौड पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असल्याने पौड पोलिसांवर मोठी जबाबदारी पडली होती. ही जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली.
या स्पर्धेसाठी स्थानिकांकडून कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून महिनाभर नियोजन केले होते. त्यासाठी वारंवार रस्त्यांची पाहणी, संभाव्य धोके, अडचणी, उपरस्त्यांवरील स्थानिकांचा रहिवास तसेच अन्य विविध बाबी लक्षात घेऊन पौड पोलिसांनी वाहतूक नियमन, नियंत्रण आणि सुरक्षित प्रवास यासाठी उत्तम समन्वय साधला होता. वाहतूक नियोजनासाठीची व्यवस्था, बाहेरून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे जेवण तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्थाही उत्तम केली होती. जागोजागी बॅरिकेडिंग उत्तम केले होते. गावोगावच्या शाळांतील शिक्षक प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील तसेच लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन नियोजनासाठी तयारी केली होती. तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बैठका घेऊन ही स्पर्धा मुळशीकरांकडून विनाअडथळा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले होते. सायकल स्पर्धेच्या मार्गावरील उपरस्ते तसेच संभाव्य अडचणी लक्षात घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे ही स्पर्धा वाहतुकीच्या दृष्टीने विनाअडथळा व सुरक्षित पार पडली. त्याची दखल घेऊन पुणे येथील अधीक्षक कार्यालयात संतोष गिरिगोसावी, राजेश गायकवाड तसेच मनोज कदम यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com