

District Collector Inspects Pune Grand Tour Cycle Track
Sakal
वेल्हे (पुणे) : राजगड तालुक्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असून पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा आपल्या गावा मधून जात असताना इतिहासाची नवीन पाने लिहली जाणार असून सह्याद्रीचा इतिहास जगासमोर घेऊन जात असताना प्रशासनास जनतेचे सहकार्य अपेक्षित असून परदेशी स्पर्धकांचे स्वागत हे महाराष्ट्राच्या संस्कृती नुसार पारंपारिक पद्धतीच्या खेळांने , ढोल ताशांच्या गजरात करावे मात्र स्वागत करताना शिस्त पाळणे महत्त्वाचे असून स्पर्धेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.