Cold Cough
sakal
पुणे - थंड वारे, कोरडी व प्रदूषित हवा या कारणांमुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. वातावरणात अचानक वाढलेला गारठा आणि हवामानातील तीव्र बदल यामुळे नागरिकांना विशेषतः घशाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांना खोकल्यासह घसा खवखवणे, वेदना होणे, कफ पडणे ही लक्षणे जाणवत आहेत. लहान मुलांमध्येही संसर्गाचे प्रमाण दिसून येत आहे.