पुण्यात टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; सहा गाड्यांची तोडफोड  

टीम ई-सकाळ
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

सहा ते सात जणांचे टोळके हातामध्ये कोयते, लाकडी दांडके घेऊन त्यांच्या परिसरामध्ये आले. आरडाओरडा करीत परिसरात थांबलेल्या सगळ्या लोकांना फोडा, अशी धमकी देत शिवीगाळ केली.

पुणे : हातामध्ये धारदार शस्त्रे घेतलेल्या टोळक्याने रस्त्याच्याकडेला लावलेल्या स्कूल व्हॅन, दुचाकी व रिक्षा अशा सहा वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. याबरोबरच टोळक्याने आरडा-ओरडा करत परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता वारजे येथे घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणी धनंजय ढावरे (वय 39, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन विशाल अशोक सोनवणे (वय 24, रा.सुयोगनगर, वारजे) यास अटक करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे माळवाडी येथील काळुबाई मंदिर परिसरामध्ये राहतात. ते स्कूल व्हॅन चालक आहेत. शुक्रवारी रात्री फिर्यादी घरी असताना फिर्यादी यांच्या तोंडओळखीच्या एका व्यक्तीसह सहा ते सात जणांचे टोळके हातामध्ये कोयते, लाकडी दांडके घेऊन त्यांच्या परिसरामध्ये आले. आरडाओरडा करीत परिसरात थांबलेल्या सगळ्या लोकांना फोडा, अशी धमकी देत शिवीगाळ केली. यानंतर फिर्यादी यांचे रस्त्याच्याकडेला लावलेली स्कूल व्हॅनवर कोयता, लाकडी दांडके मारून काचा फोडल्या. त्यानंतर आरोपींनी यशोदिप चौक, परमार्थ निकेतन येथे जाऊन रमेश सईने यांच्या दोन दुचाकी, सिमरन शेलार, पुजा भोज यांची प्रत्येकी एक दुचाकी व रविंद्र शिंदे यांच्या मालकीची रिक्षा, अशा सहा वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पुन्हा नागरीकांना शिवीगाळ करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

रुग्णालयाच्या पार्कींगमधील दुचाकीची तोडफोड 
कमला नेहरू रुग्णालयाच्या पार्कींगमध्ये लावलेली दुचाकी अनोळखी व्यक्तींनी फोडली. त्यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी संतोष धायबर यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune group of boys broken vehicles warje area

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: