Pune News : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात खरेदीचा उत्साह; सराफ बाजारासह वाहन विक्रीतही वाढ

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यात सराफ बाजार, कपडे व वाहन खरेदीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले.
Festive Rush Boosts Pune Markets

Festive Rush Boosts Pune Markets

Sakal

Updated on

पुणे : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीला पसंती दिली. विशेषतः सराफ दालनांत ग्राहकांची मोठी गर्दी होती. सकाळपासूनच अनेक दालनांमध्ये खरेदी वाढली होती. सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी शुभ मानली जात असल्याने महिलांचा विशेष उत्साह दिसून आला. पारंपरिक दागिन्यांसह हलक्या वजनाच्या आधुनिक डिझाईन्सनाही चांगली मागणी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com