कारली, दोडके, टोमॅटो, मिरची, शेवग्याच्या भावात घट
मार्केट यार्ड, २२ : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने काही प्रमाणात वाढली होती. परिणामी मागणी कमी असल्याने कारली, दोडके, फ्लाॅवर, कोबी, टोमॅटो, मिरची, शेवगा, तोतापुरी कैरीच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घट झाली तर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी राज्यासह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतील आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची १५ टेम्पो, कर्नाटकातून कोबी पाच टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा पाच टेम्पो, राजस्थानातून गाजर दोन टेम्पो, कर्नाटकातून घेवडा तीन टेम्पो तर पावटा दोन टेम्पो, कर्नाटक आणि गुजरातमधून भुईमूग शेंगा प्रत्येकी तीन टेम्पो, आंध्र, कर्नाटक व तमिळनाडूतून तोतापुरी कैरी आठ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची १० टेम्पो तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याची ३० टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ८०० गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार आठ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची तीन टेम्पो, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी पाच टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, गाजर तीन टेम्पो, घेवडा तीन टेम्पो तर पावट्याची दोन टेम्पो आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे १० किलोंचे भाव : कांदा : ९०-१२०, बटाटा : ५०-१२०, लसूण : ४००-१०००, आले सातारी : ३५०-५००, भेंडी : २५०-४००, गवार : ३००-७००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ५००-५५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : १५०-२००, काकडी : १००- १२०, कारली : हिरवी : २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ५०-८०, वांगी : १५०-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी : २५०-३००, जाड : १००-१५०, शेवगा : १००-३००, गाजर : २००-२५०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-५५०, भुईमूग शेंग : ७००-१०००, मटार : परराज्य : ४५०, स्थानिक : ५००-५५०, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ५००-६००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
कोथिंबिरीच्या सव्वालाख जुड्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची एक लाख २५ हजार जुडी, तर मेथीच्या ६० हजार जुड्यांची आवक झाली. आवक आणि मागणी स्थिर असल्याचे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ७००-१५००, मेथी : ८००-१२००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-७००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ८००-१५००
मोसंबी, द्राक्षांचे भाव घटले
गेल्या आठवड्याच्या तुलनेने फळबाजारात फळांची आवक कमी झाली. रमजान ईद आणि सलग सुट्ट्यांमुळे फळांना मागणी कमी होती. त्यामुळे रविवारी मोसंबी, द्राक्षांच्या भावात ३० टक्के घट झाली होती. इतर बहुतांश सर्व प्रकारच्या फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.
येथील फळबाजारात मोसंबीची ४० टन, संत्रा १० टन, डाळिंब ३० टन, पपई १२ टेम्पो, लिंबाची सुमारे १००० गोणी, कलिंगड १०० टेम्पो, खरबूज ४० टेम्पो, चिक्कू १२ टन, पेरू आठ टन, अननस सहा ट्रक तर द्राक्षांची ४० टन आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ७०० ते १८००, मोसंबी : (३ डझन) : १२०-३२०, (४ डझन) : ५०-११०, संत्रा : (१० किलो) : ४००-१५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२००, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-३०, कलिंगड : १०-१४, खरबूज : १५-२२, पपई : ८-१८, चिक्कू (१० किलो) : १५०-३००, पेरू रेड डायमंड (१० किलो) : ७००-११००, पिंक पेरू (१० किलो) : ३००-७००, अननस (१ डझन) : १००-६००. द्राक्षे : (१५ किलो) : सुपर सोनाका : ६००-११००, सोनाका : ६००-११००, जम्बो (१० किलो) : ६००-११००, स्ट्रॉबेरी (२ किलो) : २००-३००.
फुलांच्या भावात १० टक्क्यांनी घसरण
फूलबाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. त्या तुलनेत मागणी कमी आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात १० टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : १००-१५०, अॅष्टर : जुडी : १०-२०, सुट्टा : १००-१५०, कापरी : २०-४०, शेवंती : ५०-१२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : ३०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : २००-२५०, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, ऑर्चिड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : ५०-६०, लिली बंडल : ८-१०, मोगरा : ३००-५००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

