

Pune Hadapsar Rs 47 Lakh Burglary Case Solved, Gold and Cash Worth Rs 38.54 Lakh Recovered
esakal
पुणे : हडपसर परिसरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या ४७ लाख रुपयांच्या घरफोडीचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाने छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि साडेसात लाख रुपये रोख असा ३८ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.