
Pune Crime News: पुण्यातील हडपसर परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. मस्तीच्या नादात गावठी पिस्तूलातून सुटलेली गोळी एका तरुणाच्या खांद्यात लागल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना हडपसरमधील पांढरे मळा कॅनॉल परिसरात रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी तरुण सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.