Pune Crime : हडपसरमध्ये चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त, पोलिसांकडून तिघांना अटक; अनेक गंभीर गुन्हे दाखल
Three Notorious Criminals Arrested in Hadapsar : काळेपडळ पोलिसांनी हडपसरमधील महंमदवाडी परिसरात सापळा रचून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची चार पिस्तुले आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पुणे : सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची चार पिस्तुले आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तिघांना अटक केली.