Midnight Inferno in Pune’s Hadapsar: 19 Shanties Reduced to Ashes, Probe Underway
esakal
पुणे
Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान
Hadapsar fire incident update: हडपसर परिसरात मध्यरात्री भीषण आग; १९ झोपड्या जळून खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
हडपसर, ता. २१ : येथील लोहिया गार्डन मगरपट्टा चौकाजवळील भोरी पडळ भागात भीषण आग लागून एकोणीस झोपड्या भस्मसात झाल्या. अज्ञाताने एका घरासमोरील पेटवून दिलेल्या मोटारसायकलच्या धगीने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यामध्ये राहणाऱ्या भाडेकरूंचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. वेळीच सर्व कुटुंबे घराबाहेर पडल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

