pune
punesakal

प्रोत्साहन देण्यापेक्षा समाज आमच्यावर दया दाखवतो - राधेय पिल्ले

समाजाची ही वृत्ती आता बदलायला हवी.’’ असे मत २६ वर्षीय दिव्यांग राधेय लक्ष्मण पिल्ले याने व्यक्त केले.

पुणे : ‘‘दिव्यांग म्हणून आम्हाला प्रोत्साहन देण्यापेक्षा समाज आमच्यावर दया दाखवतो. अशा स्थितीत स्वतःचा आत्मसन्मान कायम ठेवत प्रोत्साहन देणे आव्हानात्मक ठरते. समाजाची ही वृत्ती आता बदलायला हवी.’’ असे मत २६ वर्षीय दिव्यांग राधेय लक्ष्मण पिल्ले याने व्यक्त केले.

पुण्यातील एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत राधेय पिल्ले याची स्व-रूपवर्धिनी स्पर्धापरिक्षा केंद्र व अभ्यासिकेच्या वतीने मुलाखत घेण्यात आली. ‘श्रमिकांचा बप्पा’ विशेष कार्यक्रमात तुषार नंदा नांगुर्डे यांनी राधेयची मुलाखत घेतली. यावेळी स्व- रूपवर्धिनीचे सहकार्य अध्यक्ष डॉ. संजय तांबट, महिला विभागाच्या सहकार्यवाह पुष्पा नडे, विनोद मोरे, साईनाथ उकिरडे, संदेश खंडागळे, सीमा लांडे, मनीषा नरडेकर, किसन ताकमोडे आदी उपस्थित होते.

pune
इंदापूर रयत शाळा प्रांगणात ३०० झाडांची लागवड.

राधेय म्हणाला, ‘‘जीवनाचा प्रवास हा संघर्षमय होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी विजेचा झटका लागल्याने दोन्ही हात गमावले. त्यावेळी उपचार सुरू असतानाच एका अपघातात आई वडिलांचे प्राण गेले. या लहान वयातच मी अनाथ झालो आणि आयुष्यभराचे अपंगत्व आले. अनाथ आश्रमालाच स्वतःचे घर समजून तेथील मित्र परिवारासोबत लहानाचा मोठा झालो. शिक्षण घेत असताना सुरवातीला पेपर देताना अडचणी येत होत्या, पण

परिस्थितीपुढे हार न मानता मी स्वतः पायांनी पेपर लिहिण्यास सुरवात केली. स्वतःची कामे स्वतः करण्यास शिकलो. यामुळे रोजच्या कामात कोणाच्या मदतीची गरज पडत नाही. दहावीनंतर शिक्षणासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे नोकरी शोधत असताना ४५ इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला एक नोकरी मिळाली आणि अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले आणि आज संगणक अभियंता म्हणून काम करत आहे.’’

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती पाटील यांनी केले.

‘‘समाजात असेही काही लोकं आहेत जे समाजातील दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने काम करतात. त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देतात. ज्यामुळे अशी मुलं मुले हे सामान्य मुलांप्रमाणे मुख्य प्रवाहातील सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. यासाठी दिव्यांगांनी पण तशी जिद्द मनात ठेवणे गरजेचे आहे.’’

- राधेय लक्ष्मण पिल्ले, संगणक अभियंता

मातृभाषेचा अभिमान :

आजच्या काळात सर्व क्षेत्रात इंग्रजी या भाषेला प्राधान्य दिले जाते. शाळेत असताना सुरवातीला मला ही इंग्रजी शिकताना अनेक अडचणी आल्या. पण इंग्रजी शिकत असताना मराठीचा विसर पडला नाही. मराठी या भाषेचा मला अभिमान आहे. असं राधेय म्हटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com