Pune: मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशन

पुणे : मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवारपासून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने गुरूवार (ता.१८)पासून राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन भरविण्यात येणार आहे. महामंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. ओझर (ता. जुन्नर) येथील श्री क्षेत्र विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक भवनात होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील यांनी दिली.

दोन दिवसीय अधिवेशनात खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी राज्यातून साधारण १५०० ते २००० माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात शैक्षणिक समस्यांवर चर्चा होऊन त्यावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत तसेच विविध विषयांवर शोधनिबंध देखील सादर करण्यात येणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांसह सचिव शांताराम पोखरकर, जिल्हा संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सचिव सुरेश कांचन, प्राचार्य अविनाश ताकवले आदींनी अधिवेशनाचे संयोजन केले आहे.

loading image
go to top