
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून, पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.