

पुणे, ता. २ : पावसाळी गटारांचे चेंबर स्वच्छ न केल्याने माती, खडी आणि कचरा त्यावर अडकून पावसाच्या पाण्याच्या निचरा न झाल्याने रात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील १५ ते २० ठिकाणी पाणी तुंबले. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे याबाबत सुमारे ३५ तक्रारी प्राप्त झाल्या. याशिवाय, शहरात १२ ते १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने, या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहराच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला.
कात्रज, आंबेगाव, व्हीआयटी महाविद्यालय परिसर, उंड्री, कोथरूड, धायरी, नगर रस्त्यावरील तरवडे वस्ती परिसर आदी ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. पावसाळी गटारांच्या चेंबरमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला. चेंबर स्वच्छ करताना बाहेर काढलेली माती, खडी आणि कचरा रस्त्यावरच राहिल्याने ते पावसाच्या पाण्यासोबत पुन्हा वाहून जाऊन जाळ्यांमध्ये अडकले. त्यामुळे पाणी तुंबल्याच्या तक्रारी वाढल्या.
दरम्यान, जोरदार पावसामुळे कोथरूड, कात्रजसह शहरातील विविध भागांत १२ ते १३ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी समन्वय साधून तक्रारींचे निराकरण करण्यात आले.घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.