

Pune wakes up to heavy rain followed by a play of sun and clouds
Sakal
पुणे : शहर परिसरात पावसाने गुरुवारी (ता. ३०) पहाटे जोरदार हजेरी लावली. दुपारी ढगांच्या लपंडावाबरोबरच प्रखर ऊन पडल्याने पुणेकरांनी ऊन-सावलीचा खेळ अनुभवला. शुक्रवारी (ता. ३१) अति हलक्या पावसाची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.