esakal | Pune: दिवेघाट-वडकीमध्ये जोरदार पावसाची हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

जोरदार पावसाची हजेरी

पुणे : दिवेघाट-वडकीमध्ये जोरदार पावसाची हजेरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : वडकी (ता. हवेली) परिसरामध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले होते. उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, महंमदवाडी परिसरातही पावसाने हजेरी लावली. सासवड रस्त्यावरील वडकी नाला, कानिफनाथ डोंगर ते दिवेघाट दरम्यान वाहनांचा वेग मंदावला होता.

गणेशोत्सवानंतर वरुणराजाचे घटस्थापनेच्या मुहूर्तावर कमबॅक झाले. ढगांच्या गडगडाटासह आज (शनिवार, दि. ९) मुसळधार पाऊस झाला होता. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला, असे वडकीमधील नागरिकांनी सांगितले.

loading image
go to top