Pune Rain: पुणेकरांची पहाट पावसाने उजाडली! साडेसहापर्यंत मुसळधार पाऊस; कोणत्या भागांत कोसळल्या जोरदार सरी?

Heavy Rainfall in Dhayari, Ambegaon and Sinhagad Road : पुण्यात पहाटे पावसाची जोरदार हजेरी; धायरी, आंबेगाव, सिंहगड रस्ता आणि सुसगाव परिसरात मुसळधार पाऊस, तर काही भागांत हलक्या सरींची नोंद.
Pune Rain: पुणेकरांची पहाट पावसाने उजाडली! साडेसहापर्यंत मुसळधार पाऊस; कोणत्या भागांत कोसळल्या जोरदार सरी?
Updated on: 

पुणे शहर आणि परिसरात १ नोव्हेंबरच्या पहाटे काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः धायरी, आंबेगाव आणि सिंहगड रस्ता परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर अधिक होता. सकाळी साडेसहापर्यंत या भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय सुसगाव परिसरातही जोरदार पाऊस झाला. शहरातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना पहाटेच्या वेळी पावसाचा अनुभव आला.

Loading content, please wait...