

Pune Rain
sakal
पुणे : जिल्ह्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गुरुवारी (ता. २३) सायंकाळी व रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी जुन्नर व पुरंदर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. तसेच, भोर, मुळशी आणि जुन्नर तालुक्यातील भात पिकावर या पावसामुळे संकट आले आहे.