
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला हिरवा कंदील मिळाला असतानाच; पुण्यात खंडपीठ स्थापन करण्याबाबत राज्याच्या विधिमंडळाने ४७ वर्षांपूर्वी केलेला ठराव अजूनही ‘तारीख पे तारीख’ अवस्थेत रखडला आहे. पुण्यात खंडपीठाच्या मागणीचा निकाल केव्हा लागणार, असा प्रश्न वकील व पक्षकारांकडून उपस्थित केला जात आहे.