Pune : आधी पैसे मगच 'उपचार' न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू; सरदार वल्लभ भाई पटेल रुग्णालयातील प्रकार

नातेवाइकांनी पाच हजार रुपये लगेच तर उर्वरित पाच हजार रुपये नंतर भरतो, असे सांगितले
pune hospital Sardar Vallabhbhai Patel woman dies not getting treatment crime police
pune hospital Sardar Vallabhbhai Patel woman dies not getting treatment crime policesakal

कॅन्टोन्मेंट : वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार कँटोन्मेट बोर्डाच्या सरदार वल्लभ भाई पटेल रुग्णालयात घडला आहे. पटेल रुग्णालय हे सध्या एका खाजगी संस्थेला चालविण्यास दिले आहे.

आधी दहा हजार भरा मगच उपचार असे आय सी यू विभागातील डॉक्टरांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने रुग्णाला आपला जीव गमवावा लागला असल्याची तक्रार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय कवडे यांनी केली आहे.

18 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता 58 वर्षीय सुनंदा मधुकर विकृद या महिलेला अत्यवस्थ जाणवत असल्याने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयासीयुची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगून त्यांना त्यासाठी दहा हजार रुपये आधी जमा करा, असे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले. नातेवाइकांनी पाच हजार रुपये लगेच तर उर्वरित पाच हजार रुपये नंतर भरतो, असे सांगितले.

परंतु, उपचार करायचे असतील तर आधी पैसे भरावेच लागतील असे सांगण्यात आले. सुमारे अर्ध्या तासानंतर पैशाची जमवाजमवी करून पैसे भरले. त्यावेळी उपचारासाठी साडेचार हजार रुपयांची औषधेही लगेच लिहून देण्यात आले. याचा शारीरिक व मानसिक त्रास मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागला.

सकाळी पाच वाजता दाखल झालेल्या रुग्णाला सकाळी सात वाजता मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. रुग्णावर वेळीच उपचार सुरू केले असते, तर त्याचे जीव वाचले असते. परंतु आयसीयू चालकांच्या हलगर्जी व आडमुठेपणामुळे महिलेचा जीव गेला असून, यात दोषी असणाच्यांवर कारवाई करा, अशी मागणी कवडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान हे सर्व आरोप रुग्णालय प्रशासनाकडून खोडून काढण्यात आलेले आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तपासे म्हणाल्या की, रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच नातेवाईकांना पैसे भरण्यासाठी सांगितले होते. त्यांची परिस्थिती जाणून व पैशाअभावी आम्ही उपचार थांबवले नाही, उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com