
पुणे : शस्त्रक्रियेदरम्यान भुलीच्या औषधांमुळे किंवा स्नायूंशी संबंधित आनुवंशिक दोषामुळे निर्माण झालेल्या ‘मॅलिग्नंट हायपोथर्मिया’ या दुर्मीळ मात्र, जीवघेण्या वैद्यकीय स्थितीवर उतारा व जीवनरक्षक असलेले ‘डँट्रोलिन’ औषध पुण्यातील रुग्णालयात कोठेही उपलब्ध होत नाही. परिणामी, रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. ‘डँट्रोलिन’ पुण्यात उपलब्ध करण्यासाठी ‘मेडिको लीगल सोसायटी ऑफ इंडिया’ने एक प्लॅन तयार केला असून, तो यशस्वी झाल्यास मृत्यू टाळता येतील.