पुणे : वेताळ टेकडीच्या रक्षणासाठी शेकडो नागरिक एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वेताळ टेकडी

पुणे : वेताळ टेकडीच्या रक्षणासाठी शेकडो नागरिक एकत्र

पुणे : पुणे महापालिकेतर्फे वेताळ टेकडी फोडून दोन रस्ते, बोगदा केला जाणार असल्याने त्यास विरोध करण्यासाठी शेकडो पर्यावरणप्रेमी एक मे रोजी सकाळी एकत्र आले. त्यांनी त्यांच्या तीव्र भावना यावेळी व्यक्त करत महापालिकेच्या या प्रकल्पाला कडाडून विरोध करत टेकडीच्या संवर्धानसाठी आम्ही कटीबद्ध आहोत असा संकल्प केला.

पुणे महापालिकेने कोथरूड, सेनापती बापट रस्ता यासह इतर भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वेताळ टेकडीमधून दोन बोगदे, दोन रस्ते करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येणार आहे. अशी भूमीका शहरातील पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे.

या प्रकल्पाला करण्यासाठी महाराष्ट्र स्थापना दिनाच्या दिवशी (ता. १) शेकडो नागरिक वेताळ टेकडीवर एकत्र आले. त्यांनी हातामध्ये फलक, टेकडीचे चित्र घेऊन सकाळी सात वाजल्यापासून आंदोलन सुरू केले. सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, परिवर्तन, मिशन ग्राउंड वॉटर, ग्रीन पुणे मूव्हमेंट, डेक्कन जिमखाना परिसर समिती, पाषाण एरिया सभा, औंध विकास मंडळ, पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था, बाणेर पाषाण लिंक रोड विकास समिती, असोसिएशन ऑफ नगर रोड सिटिझन फोरम, वसुंधरा स्वच्छता अभियान, देवनदी स्वच्छता अभियान, रामनदी स्वच्छता अभियान, ५१ ए ग्रुप, जीवितनदी, परिसर, कल्पवृक्ष, वॉरिअरर्स मॉम्स, आनंदवन फाउंडेशन या संघटना यात सहभागी झाल्या होत्या.

‘‘नवीन रस्ते, बोगदे करण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातच मेट्रोच्या भूमिपुजनाच्या वेळेस सांगितले होते. असे असताना पुणे महापालिका शहराच्या मध्यवर्ती भागातील टेकडी फोडून रस्ता व बोगदा करत आहे. ही टेकडी आपल्याला मिळालेला एक अमूल्य वारसा आहे. तेथील जैवविविधता, भूगर्भातील जलस्त्रोत यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोध आहे.’’

- सुमीता काळे, पर्यावरणप्रेमी

Web Title: Pune Hundreds Citizens Come Protect Vetal Hill

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top