धक्कादायक! पुण्यात आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या; पतीने घेतला गळफास

सनील गाडेकर
Wednesday, 29 July 2020

अविनाश गोरे हे एलआयसीमध्ये स्टेनोग्राफर होते. वैशाली गोरे यांना वयोमानानुसार अनेक व्याधी झाल्या होत्या. तर अविनाश गोरे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या मित्रांना आपले गुडघे खुप दुखत असल्याचे भेटल्यावर सांगितले होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
 

पुणे : आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा खुन केला व त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्वेनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अविनाश हेमंत गोरे (वय 69) आणि वैशाली हेमंत गोरे (दोघे रा. गंगा विष्णु संकुल, कर्वेनगर) अशी या ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश गोरे हे एलआयसीमध्ये स्टेनोग्राफर होते. वैशाली गोरे यांना वयोमानानुसार अनेक व्याधी झाल्या होत्या. तर अविनाश गोरे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या मित्रांना आपले गुडघे खुप दुखत असल्याचे भेटल्यावर सांगितले होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नातेवाईकांनी अनेकदा संपर्क करुनही ते फोन उचलत नसल्याने अलंकार पोलिसांना 27 जुलै रोजी दुपारी याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घरी जाऊन पाहिले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यांना एक कन्या असून ती विवाहित आहे. त्या सिंहगड रोडला रहायला आहेत. त्यामुळे हे दोघे कर्वेनगरमध्ये रहात होते. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे यांनी फिर्याद दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In pune husband killed his wife and strangle himself due to Tired of illness