

Pune
esakal
पुणे: शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अवैध दारूधंद्यांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करणाऱ्या पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. हडपसर आणि फुगेवाडीत विषारी गावठी दारूमुळे १८ कष्टकऱ्यांचा बळी गेल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अर्थपूर्ण व्यवहार करणारे हे छुपे यमदूत आणखी किती जणांचे बळी घेणार?’ असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.